यूपीआयद्वारे पेमेंटला पसंती, वर्षभरात व्यवहार 49 टक्क्यांनी वाढले

यूपीआयद्वारे पेमेंटला ग्राहकांची पसंती मिळत असून वर्षभरात व्यवहारांची संख्या तब्बल 49 टक्क्यांनी वाढली आहे. जून 2024 मध्ये यूपीआयद्वारे 1,389 कोटी व्यवहार झाले असून या कालावधीत एकूण 2,007 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली. वार्षिक आधारावर व्यवहारांची संख्या 49 टक्क्यांनी वाढली असून याद्वारे हस्तांतरित केलेल्या रकमेत 36 टक्के वाढ झाली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पेरेशन ऑफ इंडियाने आज ही आकडेवारी जाहीर केली. वर्षपूभरार्वी म्हणजेच जून 2023 मध्ये 934 कोटी व्यवहारांद्वारे 14.75 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. मे 2024 मध्ये यूपीआयद्वारे 1,404 कोटींचे व्यवहार झाले असून त्यातून 20.45 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.