कारचालकाने महिला पोलीस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी कारचालक संदीप कनोजियाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. शुक्रवारी त्या कर्तव्यास होत्या. रात्री 11 च्या सुमारास त्याने कारचालक संदीपला थांबवले. टुरिस्ट कार असल्याने त्याला पोलिसांनी ड्रेसबाबत विचारणा केली. त्याला दंड भरण्यास सांगितले. दंड भरण्यास सांगितल्याचा त्याला राग आला. त्याने तक्रारदार याच्यासह दोन पोलिसांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने तक्रारदार याची कॉलर पकडली. त्यामुळे बळाचा वापर करून संदीपला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरडाओरड करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने ई-चलन मशीन तोडण्याचा प्रयत्नदेखील केला. याची माहिती समजताच आरसीएफ पोलीस घटनास्थळी आले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संदीपविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच त्याला पोलिसांनी अटक केली.