विराट, रोहितनंतर आता रवींद्र जडेजाचीही निवृत्तीची घोषणा; विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याने भावुक

टीम इंडियाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. तब्बल 17 वर्षांनंतर मिळालेल्या या विजयाचा जल्लोष साजारा होत असतानाच धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टी -20 प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. या दोन खेळाडूनंतर आता रवींद्र जाडेजा यानेही टी-20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इन्स्टाग्राम अंकाऊटवर याबाबतची घोषणा केली आहे. ‘विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरले’ असे भावुक उद्गारही त्याने काढले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindrasinh jadeja (@royalnavghan)

प्रत्येक सामन्यात आपली उपस्थिती दर्शवत चमकदार कामगिरी करणाऱ्या जाडेजानेही आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट लिहून त्याने याबाबतची माहिती दिली आहे. सुसाट वेगानं अभिमानानं धावणाऱ्या अश्वमेधाप्रमाणं देशासाठी मी माझं सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न केला. इतर फॉरमॅटमध्ये मी माझं सर्वोत्त योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. टी 20 वर्ल्डकप जिंकण हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. हे माझ्या टी 20 कारकिर्दीचं सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे आता टी 20 मधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाच्या अनेक आठवणी सोबत आहेत. तसेच चाहत्यांनी दिलेले प्रोत्साहन अन् पाठिंब्यासाठी सर्वांना धन्यवाद, असेही रवींद्र जडेजा म्हणाला.