रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; मारूती मंदिर येथील रस्त्याची चाळण

पावसाळा सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. मारूती मंदिर येथील रस्त्याची चाळण झाली असून वाहन चालकांना दररोज कसरत करावी लागत आहे.

गेल्या काही दिवसात रत्नागिरीला पावसाने झोडपून काढले. पाऊस सुरू होताच रत्नागिरी शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येने डोके वर काढले आहे. मारूती मंदिर येथील मुख्य रस्त्यावर अलीकडेच डांबरीकरणाचा पट्टा मारला होता. मात्र, पहिल्या पावसातच हा रस्ता खड्डेमय झाला असून सर्व खडी बाहेर आली आहे. एस.टी.स्टॅण्ड समोरील रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यातून गाडी चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यातील हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेने लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.