विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन होईल, सुनील प्रभू यांचा ठाम विश्वास

आजच्या घडीला विविध प्रश्नांवर शेतकरी  कष्टकरी , कामगार विद्यार्थी गृहिणी या सर्वांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे. या असंतोषाला आपण लोकसभा निवडणुकीत सामोरे गेलात. आता विधानसभेतही अशा रितीने सामोरे जावे लागेल. विधानसभेत जो फटका बसेल त्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड मोठे परिवर्तन होईल, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी आज व्यक्त केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी विविध मुद्दय़ांवर राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यपाल दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करताना प्रत्येक वेळेस शाहू-फुले-आंबेडकर-छत्रपती शिवाजी महाराज अशा महान व्यक्तींचे अनुकरण करून हा महाराष्ट्र पुढे जात आहे असे सातत्याने सांगतात, पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आज राज्याचे प्रशासन सुरू आहे त्यावर खरोखरच सरकारने त्याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज प्रभू यांनी व्यक्त केली.

राज्यपालांनी सीमा प्रश्नावर भाष्य केले होते. त्याचा समाचार घेताना सुनील प्रभू म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे राज्यपाल सांगत असतात. पण खऱया अर्थाने हा प्रश्न आपण सोडवणार कधी हा प्रश्न सीमाभागातील मराठी बांधवांच्या मनात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपले वकील कोणता प्रयत्न करीत आहेत याची माहिती द्यावी.

z मुख्यमंत्री दोनवेळा दावोसला गेले आणि दावोसमधून फार मोठी गुंतवणूक आणली असे सांगितले. दावोसमध्ये जाऊन मराठी पंपन्यांशी व्यवहार केले. त्यांना ऑफर लेटर दिली, पण पुढे काही झाले नाही. शेतमालाच्या निर्यातीला सरकार परवानगी देत नाही, पण बंदी असली तर वन ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था कशी नेणार, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला.