हिंदुस्थानच्या महिलांनी वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार खेळ करत मालिका जिंकून आपले नाणे खणखणीत वाजवले होते. तोच फॉर्म कायम ठेवत टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. या सामन्यात Shafali Verma ने धुवांधार फलंदाजी करत इतिहास रचला आहे. तसेत शफाली आणि स्मृती मानधाना या जोडीने 20 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकमेव कसोटी सामना सुरू आहे. टीम इंडिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरली असून सलामीला आलेल्या स्मृती मानधाना आणि शफाली वर्माने दक्षिण आफ्रिकेच्या गोलदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघींनी तुफान फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 292 धावांची ऐतिहासीक भागिदारी केली. स्मृती मानधाना 149 रनांची वादळी खेळी. तसेच 20 वर्षीय शफाली वर्माने 194 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले आहे. या द्विशतकासोबत शफाली महिलांच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद द्विशतक झळकावणारी एकमेव फलंदाज ठरली आहे. शफालीने ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेला सदरलँडचा 256 चेंडूंत द्विशत झळवकण्याचा विक्रम मोडीत काढला.
स्मृती आणि शफाली यांनी पहिल्या विकेटसाठी 292 धावांची एतिहासीक भागिदारीची केली. स्मृती आणि शफालीची जोडी महिला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी पहिली जोडी ठरली आहे. कराचीमध्ये 2004 साली पाकिस्तानच्या साजिद शाह आणि किरण बलोच यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 241 धावांची भागीदारी केली होती. त्यांचा हा विक्रम आता स्मृती आणि शफालीने मोडित काढला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या दिवसाअखेर चार गड्यांच्या मोबदल्यात 525 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाने महिलांच्या कसोटी सामन्यात प्रथमच 500 धावांचा टप्पा सुद्धा पार केला आहे.