राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गुरुवारी संसदेत अभिभाषण झाले. त्यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत झळकावल्याने काँग्रेस भडकली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणात पंतप्रधान मोदींना 73 वेळा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 7 वेळा दाखवण्यात आले आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला.
राष्ट्रपतींच्या 51 मिनिटांच्या अभिभाषणात कोणाला किती वेळा दाखवण्यात आले? सभागृह नेते नरेंद्र मोदी यांना 73 वेळा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 6 वेळा दाखवण्यात आले. सत्ता पक्षाला 108 वेळा तर विरोधकांना 18 वेळा दाखवले. संसद टीव्ही हा सभागृहाचे कामकाज दाखवण्यासाठी आहे, कॅमेरामजीवींच्या आत्ममग्नतेसाठी नाही, असा हल्लाबोल जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर केला.
51 मिनट के राष्ट्रपति के संबोधन में किसको कितनी बार दिखाया गया?
• नेता सदन नरेंद्र मोदी : 73 बार
• नेता प्रतिपक्ष राहुल गांधी: 6 बार• सरकार: 108 बार
• विपक्ष: 18 बारSansad TV सदन की कार्यवाही दिखाने के लिए है, कैमराजीवी की आत्ममुग्धता के लिये नहीं
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 27, 2024
मोदी सरकारने लिहिलेल्या राष्ट्रपतींचे अभिभाषण ऐकून असे वाटले की पीएम मोदी सतत नकार देत आहेत. जनतेचा कौल त्यांच्या विरोधात होता. कारण देशातील जनतेने त्यांचा 400 प्लसचा नारा नाकारला आणि भाजपला 272 च्या आकड्यापासून दूर ठेवले, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.