मराठमोळी अभिनेत्री तृप्ती भोईर तिच्या आगामी हिंदी चित्रपटासाठी एका विशेष रुपरेषेत दिसली. तृप्ती चक्क नवरीच्या वेशभूषेत गळ्यात ब्राइड ऑन सेल रुपीस 6000 असे लिहिलेली पाटी टाकून रेड कार्पेटवर चालताना दिसली. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये तृप्तीच्या अवताराने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
अभिनेत्री तृप्ती भोईर तिच्या पहिल्या हिंदी सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी’ हा तिचा चित्रपट येतोय. ‘पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरची पहिली झलक कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आली. ‘पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी’ या हिंदी सिनेमात तृप्ती भोईर प्रमुख भूमिकेत असून तिच्या सोबत ताहा शाह बदुशाह याला पाहणार आहोत. ज्याला आपण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’मध्ये पहिले आहे. या सोबत पारोमध्ये आपण गोविंद नामदेव व इतर मान्यवर कलाकारांना ही पाहणार आहोत. हिंदी सिनेमाची कथा तृप्ती भोईर यांची असून पटकथा आणि गीत गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहे.
तृप्ती ने आता पर्यंत आठ ते दहा मराठी चित्रपट आणि काही सिरीयल त्या सोबत कैक नाटकेही केली आहेत. ज्या पैकी ‘आगडबम’ ची नाजूका आणि ‘टुरिंग टॉकीज’ ची चांदी ही तिची भूमिका विशेष रूपाने गाजली.