इतिहास कोण घडविणार! टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान भिडणार

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात आजवर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ कधीही अंतिम फेरीत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे जगज्जेतेपदाच्या लढाईत कोण स्थान मिळवणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. सुपर एटमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या संघाला हरवल्यामुळे अफगाणिस्तानी संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे तर स्पर्धेत नॉनस्टॉप सात विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिकाही आपल्या विजयाचे अष्टक पूर्ण करण्यासाठी सज्ज झालाय. त्यामुळे बार्बाडोस कोण गाठणार, याची साऱयांनाच उत्सुकता लागली आहे.

अफगाणिस्तानसाठी सुपर एटची साखळी खऱया अर्थाने सुपर ठरलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा संस्मरणीय विजय मिळवल्यानंतर अवघ्या अफगाणिस्तानात सुरू असलेला जश्न अजून थांबलेला नाही. बांगलादेशवर मात करून अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केल्यानंतर अवघं अफगाणिस्तान जग जिंकल्याच्या आविर्भावात जल्लोष करत होता. त्यांच्यासाठी उपांत्य फेरी गाठणेही वर्ल्ड कप जिंकल्यापेक्षा कमी नसले तरी तो संघ आता अंतिम फेरीचे स्वप्न पाहू लागला आहे आणि त्यांच्या संघात अंतिम फेरी गाठण्याची क्षमता आहे.

यंदाचे टी-20 वर्ल्ड कप गाजवले ते अफगाणिस्तानच्याच खेळाडूंनी. त्यांचे खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीत अव्वल आहेत. एकीकडे गुरबाज फलंदाजीत तर गोलंदाजीत फारुकीने आपला पहिला नंबर कायम राखला आहे. साखळीत न्यूझीलंडचा केलेला पराभव हा स्पर्धेतील सर्वात धक्कादायक गोष्ट होती आणि त्यानंतर सुपर एटमध्ये ऑस्ट्रेलियाला धक्का देत त्यांनी इतिहासच रचला. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते कधीच जिंकले नव्हते आणि जिंकलेसुद्धा टी-20 वर्ल्ड कपमध्ये. या विजयामुळे त्यांनी बांगलादेश नव्हे तर ऑस्ट्रेलियाचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.

चोकर्स आफ्रिका शिक्का पुसणार

दक्षिण आफ्रिकेच्या माथ्यावर अश्वत्थाम्यासारखी भळभळती जखम गेली तीन दशके कायम आहे. हा संघ आजवर कधीही अंतिम फेरीत पोहोचलेला नाही. आजवर त्यांनी अनेकदा अफलातून खेळ केला असेल, पण उपांत्य फेरीत हार मानण्याची त्यांची वृत्ती अद्याप संपलेली नाही. महत्त्वाच्या सामन्यात पराभूत होत असल्यामुळे त्यांच्यावर ‘चोकर्स’चा शिक्का बसला तो बसलाच. गेले तीस वर्षे तो शिक्का पुसण्यासाठी अनेकांनी जिवाचे रान केले, पण यश कुणालाही लाभले नाही. जे आजवर घडले नाही ते करून दाखवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा तगडा संघ सज्ज झाला आहे. क्विंटन डिकॉक, रिझा हेंड्रिक्स, एडन मार्करम, हेन्रीक क्लासन, ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड मिलर या एकापेक्षा एक झंझावाती फलंदाजांमुळे बलशाली झालेला आफ्रिका सुरात आली तर अफगाणिस्तानचा ध्व्वा उडवेल. त्यामुळे सामन्यात काहीही घडू शकते. सामना एकतर्फीही होऊ शकतो आणि सामन्यात विजयासाठी जीवघेणा संघर्षही होऊ शकतो. त्यांचा क्रिकेट चाहते नक्कीच मनापासून आनंद उपभोगतील.

अवघं जग अफगाणिस्तानच्या प्रेमात

अफगाणिस्तान हा सध्या क्रिकेटविश्वातील आवडता संघ ठरतोय. उपांत्य फेरीत स्थान मिळवल्यानंतर अवघ्या क्रिकेटविश्वातून त्यांच्यावर काwतुकांचा नॉनस्टॉप वर्षाव होतोय. खुद्द ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनीही त्यांचे काwतुक केलेय. या स्पर्धेतील सातपैकी पाच सामन्यांत त्यांनी बाजी मारली आहे. त्यांना साखळीत वेस्ट इंडीजकडून तर सुपर एटमध्ये हिंदुस्थानकडून हार पत्करावी लागली होती, पण त्यांनी स्पर्धेत केलेला खेळ पाहून सारेच अवाकd झाले आहेत. त्यांचा खेळ असाच सुरू राहिला तर कर्णधार राशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये पठाण 29 जूनलाही जश्न करताना दिसले तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.