सायबर क्राइम हा शब्द ज्या वेगाने कानावर पडत आहे, त्याच्या दुप्पट वेगाने सायबर गुन्ह्यांमध्ये मागील काही वर्षांमध्ये वाढ झाल्याचे उघड झाले आहे. दिवसेंदिवस Cyber Crime मध्ये वाढ होत असून अनेक नागरिक त्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळेच या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ट्राईने (TRAI) मोठे पाऊल उचलले आहे.
अनोळख्या नंबरवरुन येणारा फोन कोणाचा? याचे उत्तर फोन उचलल्या नंतरच समजते. बऱ्याच वेळा अनोळखी नंबर ओळखण्यासाठी विविध अॅप्सची मदत घेतली जाते. परंतु आता त्याची गरज पडणार नाही. कारण वाढती सायबर गुन्हेगारी भविष्यात अजून वाढण्याची शक्यता आहे. याच अुनषंगाने द टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) मोठे पाऊल उचलले असून आता अनोळखी नंबरवरुन फोन आल्यास नंबरसह त्याचे नाव सुद्धा दिसणार आहे. प्रामुख्याने मुंबई आणि हरियाणा या दोन शहरांमध्ये त्याची चाचणी सुरू करण्यात आली आहे, तर संपूर्ण देशामध्ये ही सेवा 15 जुलै पासून सुरू होणार आहे.
जुलाई से फोन कॉल करने वाले का नंबर के साथ दिखाई पड़ेगा कॉलर का नाम। सिम खरीदते समय KYC/ फॉर्म पर भरी गई जानकारी के आधार पर डिसप्ले होगा नाम।
विदित हो कि, पिछले कुछ दिनों में देश में तेजी साइबर अपराध की घटनाएँ बढ़ी हैं। उपरोक्त साइबर क्राइम के बढ़ते अपराध पर अंकुश लगाने हेतु… pic.twitter.com/pLUVD1qGa9
— NCIB Headquarters (@NCIBHQ) June 26, 2024
ज्या व्यक्तीच्या नावे सीमकार्ड खरेदी केले जाईल, त्याच व्यक्तीचे नाव नंबर सोबत दिसणार आहे. तसेच व्यवसायाच्या संबंधित फोन आल्यास संबंधित कंपनीचे नाव नंबरसह दिसणार आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे दूरसंचार कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.