काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड कऱण्यात आली आहे. बुधवारी लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान केले. ज्या राहुल गांधींची ओम बिर्ला यांनी खासदारकी रद्द केलेली त्या राहुल गांधींनीच त्यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान केलं. त्यांचे त्यावेळचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
हा हा हाहा
कौन राहुल?
ये है राहुल!
ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?@RahulGandhi @BJP4India pic.twitter.com/FFbzQditKS— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2024
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी यावरून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. राऊत यांनी तो फोटो शेअर करत ”ये तो ट्रेलर है, आगे आगे देखो होता है क्या?”, असे ट्विट केले आहे. तसेच त्यांनी पत्रकारांशी बोलताना लोकसभेचे उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाला मिळाले पाहिजे असेही म्हटले आहे. ”आम्ही लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडीला विरोध केला नाही. ही निवड बिनविरोध होते अशी परंपरा आहे. पण आम्ही दाखवून दिलं की आम्ही आता तुमच्या समोर उभे आहोत आणि राहू. ओम बिर्ला यांनी एका झटक्यात 100 पेक्षा जास्त खासदारांना निलंबीत केले होते. आणिबाणीत असे झाले नव्हते”, असे संजय राऊत म्हणाले.
#WATCH दिल्ली: शिवसेना नेता संजय राउत ने कहा, “… हमने विरोध नहीं किया, परंपरा है कि चुनाव नहीं होना चाहिए, हमने ये भी दिखाया कि हम आपके सामने खड़े रहेंगे और हैं। ओम बिरला ने एक झटके में 100 से ज्यादा सांसदों को निलंबित कर दिया था आपातकाल में ऐसा नहीं हुआ था… डिप्टी स्पीकर… pic.twitter.com/GNsSV0OWNk
— ANI_HindiNews (@AHindinews) June 26, 2024
तसेच त्यांनी आणखी एक ट्विट करत राहुल गांधी यांची विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ”आमचे राहुल गांधी हे आता लोकसभेत विरोधीपक्षाचे नेते आहेत. तुम्ही या संविधानिक पदाचा स्वीकार करून देशात लोकशाही अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आपण सर्व एक आहोत आणि एकत्र लढू व जिंकू”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.