आरळेतील बाप-लेकाला ऑनलाइन एक कोटीचा चुना; शेअर मार्केटच्या आमिषाने फसवणूक, चौघांच्या टोळीवर गुन्हा

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून आरळे (ता. सातारा) येथील बाप-लेकाला चौघांच्या टोळीने 1 कोटी 8 लाख 40 हजार 457 रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.

कलिस्ता शर्मा, देक शहा, किकी शहा, सिद्धार्थ सिंग (सर्क रा. माहीत नाही) यांच्याकिरुद्ध स्वप्नील भानुदास (वय 30, रा. आरळे, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 17 मार्च ते 5 जून 2024 या कालावधीत घडली आहे.

तक्रारदार युवकाला अनोळखी नंबरवरून फोन आला. अनोळखी व्यक्तीने ओळख सांगून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. यासंबंधी अनोळखी व्यक्तीने इतर तीन सहकाऱ्यांना फोन करायला लावून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी फोन करून संशयितांनी माहिती दिल्याने ती खरी वाटली. त्यानुसार तक्रारदारांनी वेळोवेळी बँक खात्यावर तसेच ऑनलाइन प्रणालीद्वारे 42 लाख 50 हजार रुपये पाठवले.

एवढी मोठी रक्कम पाठवल्यानंतर त्याचा चांगला परतावा मिळत असल्याचे संशयित चौघांनी तक्रारदारांना सांगितले. तसेच आणखी रक्कम गुंतवल्यास अधिक फायदा होईल, असे पुन्हा आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार युवकाने वडिलांच्या खात्यातील 65 लाख 90 हजार 457 रुपये रक्कम वेळोवेळी बँक खाते, ऑनलाइनद्वारे पाठवले. अशाप्रकारे एकूण 1 कोटी 8 लाख 40 हजार 457 रुपये संशयितांना पाठवले. संशयितांनी लककरच चांगला परतावा मिळेल, असे सांगितल्याने तक्रारदार त्याच्या खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहत होते. मात्र, पैसे जमा होत नव्हते. यासाठी वेळोवेळी फोन केल्यानंतर सुरुवातीला संशयितांनी पैसे जमा होतील, असे सांगून वेळ मारून नेली. मात्र, त्यानंतर पुन्हा तक्रारदार यांनी संपर्क केला असता ते प्रतिसाद देईना. यामुळे शंका आल्याने तक्रारदार यांनी अधिक माहिती घेतली असता फसकणूक झाल्याचे लक्षात आले. या घटनेने त्यांना धक्का बसला. यानंतर त्यांनी तत्काळ सातारा तालुका पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची तक्रार दिली. तक्रारीकरून पोलिसांनी चौघांकिरुद्ध गुन्हा दाखल केला.

शेअर  मार्केटच्या आमिषाने तब्बल 1 कोटी रुपयांची फसकणूक झाल्याने पोलीस तपासाकडे आता लक्ष लागले आहे. फसवणुकीचे प्रकार सर्रास काढले आहेत. मात्र, संशयित परराज्यातील असल्याने पोलीस तपासावर मर्यादा येतात. लहान रक्कम असल्यानंतर पोलीस त्याकडे पाहतदेखील नाहीत. यात मात्र मोठी रक्कम असल्याने पोलिसांची भिस्त तांत्रिक तपासावरच राहणार आहे. तालुका क सायबर पोलीस कसा तपास करणार? याकडे लक्ष लागले आहे.

नेमकी फसगत झाली कुठे?

शेअर मार्केटच्या माध्यमातून सीआयएनव्ही ऍपद्वारे तक्रारदारांना पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी त्या ऍपवर पाहिले. चांगला परतावा मिळत असल्याचे पाहून तक्रारदार युवकाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे निघत नव्हते. यामुळे संशयितांना फोन लावला असता त्यांनी पैसे काढण्याअगोदर शासनाचा टॅक्स भरावा लागेल, असे सांगून वेळोवेळी रक्कम भरण्यास सांगितले. यातूनच फसगत होत गेली व रकमेचा आकडा वाढत गेला.