रेल्वे खाली येऊन दोन युवकांनी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मुरसा गावाजवळील रेल्वे रुळावर घडली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे. मृतक युवकांचे नाव संदीप भेलसरे, विजय मावतकर असे आहेत. मुरसा रेल्वे वर दोन युवक रेल्वेखाली आल्याची माहिती रेल्वे चालकांनी रेल्वे स्टेशनला दिली.
त्यानुसार भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतक हे 25 ते 30 वयोगटातील असून ते अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले, एकाच वेळी दोन युवकांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या का केली याचा तपास भद्रावती पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे करीत आहे.