आर्या आंबेकरच्या मधाळ हास्याने चाहते घायाळ; पाहा तिचे सुंदर फोटो

मराठमोळी गायिका आर्या आंबेकर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आहे. झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या घराघरत पोहोचली. यानंतर ‘तिने ती सध्या काय करते’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आर्याचा कमाल आवाज आणि उत्तम अभिनयामुळे चाहते तिच्या प्रेमात पडले आहेच. दरम्यान आर्याने एका मुलाखतीनिमित्त नुकतेच एक फोटो शूट केले आहे. या शूटचे योगेश गोलांडे याने काढलेले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने क्रिम रंगाचे शर्ट आणि गुलाबी स्कर्ट परिधान केला आहे. तसेच गळ्यात हिरव्या रंगाचा नेकलेस घातला असून केस मोकळे सोडले आहेत. सोबतच हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने एकदम लाईट मेकअप केला आहे. तिच्या गोड आवाजासोबत मनमोहक सौंदर्याने तिने तिच्या चाहत्यांना भुरळ पाडली आहे. आर्याच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत तिला पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.