बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच विवाहबंधनात अडकली. तिने प्रियकर जहीर इकबालसोबत सुखी संसारासाठी लग्नगाठ बांधली खरी, पण लग्नाच्या सुरुवातीलाच त्यांना सोशल मीडियातील ट्रोलरचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. ट्रोलरने सोनाक्षीच्या अंतरधर्मीय विवाहामुळे तिला इन्स्टाग्रामवर ट्रोल केले आहे. लग्नसोहळ्यावर सोशल मीडियात द्वेष पसरवण्यात येत आहे. ट्रोलरच्या या कृत्याचा काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ट्रोलरची कानउघडणी करत सुप्रिया श्रीनेत यांनी सोनाक्षी आणि जहीर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा नुकताच 23 जून रोजी तिचा प्रियकर जहीर इकबालसोबत विवाह पार पडला.
काय म्हणाल्या सुप्रिया श्रीनेत?
सोनाक्षी आणि जहीर यांनी 23 जून रोजी मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत नागरी विवाह केला. दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडले, 7 वर्षांहून अधिक काळ ते रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांनी लग्न केले. एखाद्याला त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या प्रेम आणि अभिनंदनाच्या संदेशांची अपेक्षा असते. पण त्याऐवजी द्वेष पसरू नये म्हणून त्यांना इंस्टाग्राम अकाऊटसवरून कमेंटस् सेक्शन हाईड करावा लागला.
यानंतर सुप्रिया यांनी सोनाक्षी आणि जहीरला शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्हा दोघांनाही लग्नाच्या प्रेम, समजूतदारपणा आणि विश्वासार्ह शुभेच्छा. ट्रोल्सला काहीही माहिती नसते. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल नेहमी आनंदी रहा. देव या विषारी ट्रोलर्सनाही बुद्धी देवो.”
सोनाक्षी आणि जहीरचा विवाह ना हिंदू रिवाजानुसार होणार ना मुस्लिम रिवाजानुसार हे आधीच इकबाल रत्नासी यांनी स्पष्ट केले होते. सोनाक्षी आणि जहीरचा नागरी विवाह होईल. सोनाक्षी धर्मपरिवर्तन करणार नाही. दोन मनांचे मिलन आहे, यात धर्माची कोणतीही भूमिका नाही. हिंदू लोक देवाला देव म्हणतात आणि मुसलमान अल्लाह म्हणतात. पण शेवटी आम्हीही माणसंच आहोत, असेही पुढे जहीर वडील इकबाल रत्नासी यांनी म्हटले आहे.