देशभरात सुरू असलेल्या परीक्षांच्या गोंधळावरून संसदेच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे खासदारकीची शपथ घ्यायला जात असताना विरोधी खासदारांनी ‘नीट’ ‘नेट’ अशा घोषणा दिल्या.
धर्मेंद्र प्रधान शिक्षा मंत्री शपथ लेने के लिए
जैसे आगे बढ़े विपक्ष ने NEET UG की याद दिलाना शुरू कर दियालेकिन उनके चेहरे की मुस्कान मजाक उड़ाने वाली लग रही है pic.twitter.com/d7NPcMVQwE
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) June 24, 2024
सोमवारपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले असून इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी अगदी दणक्यात संसदेत प्रवेश केला. इंडिया आघाडीचे सर्व खासदार हातात संविधानाच्या प्रती घेऊन आले होते.
देशभरात सध्या नीट परीक्षांच्या पेपरफुटीने संतापाचे वातावरण आहे. या संतापाला विरोधी पक्ष या अधिवेशनात मोकळी वाट करून देतील व सरकारला जाब विचारणार आहेत. त्याची सुरुवात पहिल्याच दिवशी झाल्याचे दिसून आले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे खासदारकीची शपथ घेण्यासाठी जात असताना विरोधी पक्षातील खासदारांनी नीट नीट अशा घोषणा दिल्या.