कंपनीने 20 वर्षे काहीही काम न देता पगार दिला

एका फ्रेंच महिलेने तिला कंपनीने कोणतेही काम न देता 20 वर्षे पगार दिला म्हणून चक्क कंपनीवर खटला दाखल केला आहे. लॉरेन्स व्हॅन वासेनहोव्ह असे या महिलेचे नाव आहे.  1993 मध्ये फ्रान्स टेलिकॉमने लॉरेन्सला सिव्हिल सर्व्हंट म्हणून नियुक्त केले, परंतु त्यानंतर ऑरेंजने कंपनी ताब्यात घेतली. लॉरेन्स जन्मापासूनच हेमिप्लेजिक नावाच्या आजाराने ग्रस्त आहे, ज्यामध्ये तिच्या चेहरा आणि हातापायाला लकवा होतो. याशिवाय तिला मिरगीचा त्रासही होता. त्यामुळे तिच्या वैद्यकीय स्थितीच्या आधारे तिला पदाची ऑफर देण्यात आली होती.