जिओ-एअरटेलला ग्राहकांची पसंती; 12 लाख ग्राहकांची बीएसएनएला सोडचिठ्ठी

देशातील टेलिकॉम सब्सक्रायबर्सची संख्या एप्रिलमध्ये 1.2 अब्जहून जास्त झाली आहे. सरकारी टेलिकॉम पंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ला जोरदार फटका बसला असून एप्रिलमध्ये 12 लाखांहून अधिक ग्राहकांनी बीएसएनलची साथ सोडली आहे. त्यामुळे पंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप कमी झाली आहे. रिलायन्स जिओने एप्रिल महिन्यात 26.8 लाख नवीन ग्राहक जोडले. यामुळे जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या ही आता 47.24 कोटी झाली आहे. टेलिकॉम रेग्युलेटररी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या डेटामधून ही माहिती समोर आली आहे. भारती एअरटेलने जवळपास 7.52 लाख नवीन ग्राहक जोडले. त्यामुळे एअरटेलची एकूण संख्या 26.75 कोटी झाली आहे. वोडापह्न-आयडियाच्या ग्राहकांच्या संख्येतही मोठी घसरण झाली आहे.

5 जीमुळे कंपन्यांना फायदा
भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन खासगी कंपन्यांनी देशात आपले 5जी नेटवर्क सुरू केले आहे. यामुळे अनेक ग्राहक अन्य टेलिकॉम कंपनी सोडून या दोन कंपन्यांकडे आले आहेत.