मुंबईची लोकल आणि बेस्ट या दोन जीवनवाहिन्या आहेत. या दोन सेवांमुळे मुंबईकरांचे जीवन आणि प्रवास सुसह्य होतो. लोकलप्रमाणेच बेस्ट बसनेही अनेकडण प्रवास करतात. मात्र, मुंबईकरांना सेवा पुरवणाऱ्या या बेस्ट सेवेला मदत करण्यास मिंधे सरकारने नकार दिला आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या कंत्राटदार मित्रांसाठी मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी करत आहेत. मिंधे सरकार मुंबईची अजून किती लूट करणार आहेत, असा संतप्त सवालही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच सामान्य मुंबईकरांना कमी लेखू नका, आमचा अंत पाहू नका! असा खणखणीत इशाराही आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला दिला आहे.
मिंधे सरकारने बेस्टला मदत देण्यास नकार दिल्याने बेस्टला भाडेवाढ करावी लागणार आहे. त्याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रांसाठी विविध मार्गांनी मुंबई महानगरपालिकेची तिजोरी रिकामी केली जातेय, उधळपट्टी सुरु आहे, मात्र मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’ला मात्र आर्थिक सहाय्य करायला महानगरपालिकेने नकार दिलाय. त्यामुळे बेस्टला भाडेवाढ करावी लागणार आहे, ज्याचा त्रास दरोरोज बसने प्रवास करणाऱ्या सामान्य मुंबईकरांना होणार आहे.
मुंबईची लूट करू पाहणाऱ्या मिंधे-भाजप राजवटीने सामान्य मुंबईकरांचे हाल करण्याचा निश्चयच केलेला दिसतो.
का नाही बेस्टला मदत देत?
का नाही सामान्य मुंबईकरांचा विचार करत? मुंबईचं शोषण करू पाहणारे मिंधे-भाजप अजून किती काळ आमच्या मुंबईची लूट सुरु ठेवणार आहेत?
सामान्य मुंबईकरांना कमी लेखू नका, आमचा अंत पाहू नका!
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रांसाठी विविध मार्गांनी मुंबई महानगरपालिकेची तिजोरी रिकामी केली जातेय, उधळपट्टी सुरु आहे, मात्र मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’ला मात्र आर्थिक सहाय्य करायला महानगरपालिकेने नकार दिलाय. त्यामुळे बेस्टला भाडेवाढ करावी लागणार आहे,…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 21, 2024
घटनाबाह्य मुख्यमंत्री कंत्राटदार मित्रांसाठी मुंबई महानगरपालिकेची तिजोरी रिकामी करत आहेत. पैशांची उधळपट्टी सुरु आहे, मात्र मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’ला मात्र आर्थिक सहाय्य करायला महानगरपालिकेने नकार दिला आहे. त्यामुळे बेस्टला भाडेवाढ करावी लागणार आहे, ज्याचा त्रास दरोरोज बसने प्रवास करणाऱ्या सामान्य मुंबईकरांना होणार आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.