इतर राज्यातून वर्धा जिल्ह्यात बस स्थानक, रेल्वे स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या खिशातील मोबाईल चोरणाऱ्यांची टोळी पसरली होती. या आंतररज्यीय त्रिकुटाला हिंगणघाट पोलिसांनी नागपूर इथून ताब्यात घेतले आहे.तांत्रिक पद्धतीने तपास करून पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आहे. हिंगणा येथील लोकमान्य मेट्रो स्टेशन परिसरातून या चोरट्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीला गेलेले मोबाईल तसेच त्यांच्याजवळ असलेले अन्य तीन मोबाईल असा 80 हजार रुपयाचा मुद्देमाल हिंगणघाट पोलिसांनी जप्त केला आहे.