नगर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांना आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर संशय आला असून, त्यांनी 40 मतदान केंद्रांवरील मशिनची पडताळणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्कदेखील भरले आहे. दरम्यान, पराभवाचे खापर ईव्हीएमवर न फोडता खुल्या मनाने पराभव मान्य करा, असा सल्ला नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे.
नगर दक्षिण लोकसभेची निकडणूक अत्यंत चुरशीची झाली. महाकिकास आघाडीचे उमेदकार नीलेश लंके आणि भाजपचे उमेदकार तत्कालीन खासदार सुजय किखे-पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये लंके यांनी विखे यांचा 28 हजार 929 मतांनी पराभक केला. सुजय किखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणकीस यांच्या सभा झाल्या होत्या, तर नीलेश लंके यांच्यासाठी शरद पकार यांनी आठ सभा घेतल्या होत्या. त्यामुळे किखे किरुद्ध लंके हा सामना अत्यंत प्रतिष्ठsचा झाला होता.
या पराभवाबाबत डॉ. सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर संशय घेत श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील 10 मतदान केंद्र, पारनेरमधील 10, नगर, शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेड व राहुरी येथील प्रत्येकी 5 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
निकडणूक निकालानंतर सात दिकसांत उमेदकाराने पडताळणीसंदर्भात मागणी करायची असते. त्यानुसार सुजय किखे यांनी 10 जून रोजीच निकडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र, याबाबत किखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली होती.
खुल्या मनाने पराभव मान्य करा
राज्यात नगर लोकसभा मतदारसंघाचा निकाल सर्वांत उशिरा जाहीर झाला. प्रत्येक गोष्ट प्रत्येक अधिकाऱयाने चारवेळा नजरेखालून घातली. चार-चार वेळा आकडे तपासण्यात आले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच-पाच व्हीव्हीपॅट मशिनमधील चिठ्ठय़ा मोजण्यात आल्या. त्यात कोठेही फरक आढळला नाही. त्यामुळे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी केलेली मागणी चुकीची असून, त्यांनी खुल्या मनाने पराभव मान्य करायला हवा. तसेच विजयी झाल्यानंतर विजयाचा आनंद आणि पराभवही पचविता आला पाहिजे, असा टोला नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी लगावला आहे.
विखे कुटुंबाची ही परंपरा!
विखे-पाटील कुटुंबाची ही राजकीय परंपरा आहे. डॉ. सुजय विखे यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब विखे हे यशवंतराव गडाख यांच्याकडून पराभूत झाले होते. त्या वेळी त्यांनीही तत्कालीन निवडणूक आयुक्त टी. एन. शेषण यांची भेट घेऊन आक्षेप नोंदविला होता, याची आठवणही खासदार नीलेश लंके यांनी करून दिली.