निवृत्तीनंतरचे आयुष्य क्रूझवरच! ना घरभाडे, ना वीजबिलाची चिंता

सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य निवांत पद्धतीने जगता यावे म्हणून लोक शहराच्या गजबजाटापासून दूर घर, व्हिला घेतात. ऑस्ट्रेलियातील एका जोडप्याने खूप वेगळा विचार केला. या जोडप्याने चक्क समुद्रात राहण्याचा चंग बांधलाय. त्यांनी 51 क्रूझचे  बुकिंग केलंय… तेही बॅक टू बॅक… मागील तीन वर्षांपासून हे जोडपे क्रूझवर राहत आहे.

मार्टी आणि जेस अँसेन असे या अनोख्या सेवानिवृत्त जोडप्याचे नाव आहे. आतापर्यंत ते 36 क्रूझवर राहिले आहेत. क्रूझवरील जगणं एकदम वेगळे आहे. तुम्हाला कसली चिंता नाही. घरभाडं भरणे, अन्नधान्य-भाज्या आणणे, कपडे इस्त्राrला देणे अशा कामांचा विचारही मनात येत नाही. आमच्या वयाचा विचार करता नार्ंसग होमपेक्षा क्रूझवर राहायला कमी खर्च येतो आणि जग फिरता येतं ते वेगळंच, असे मार्टी आणि जेस अँसेन यांनी सांगितले.

n मार्टी आणि जेस अँसेन कुटुंबापासून दूर राहतात, पण त्यांना खंत नाही. कारण प्रिन्सेस क्रूझवरील कर्मचारी  आणि सहप्रवासी आता त्यांचे कुटुंबच झालंय. प्रिन्सेस क्रूझवर आमच्यापेक्षा कुणी जास्त काळ राहिलेलं नाही, असे मार्टी गमतीने म्हणतात.

n आलिशान अशा विला वि ओडिसी क्रूझवर सध्या दोघे राहत आहेत. हे क्रूझ 147 देशांतील 425 बंदरांतून प्रवास करणार आहे.