पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणखी एक फोटोशूट, नालंदा येथे पाहणी करताना दिल्या पोजेस…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानाआधी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरिअल येथे 36 तास ध्यानधारणा करण्यासाठी गेले होते. यावेळी मोदींचे अवघ्या 46 सेकंदांत तब्बल 20 अँगल्सने त्यांचे फोटो टिपण्यात आले. त्या फोटोंवरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र मोदींचे कॅमेरा प्रेम काही कमी होताना दिसत नाही. बुधवारी मोदी नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी नालंदा उत्खननाच्या ठिकाणी भेट दिले. या वेळी त्या ठिकाणी फेरफटका मारताना मोदींनी फोटोशूट केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी स्वत: हे फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटला शेअर केले आहेत. ”नालंदाच्या उत्खननातील अवशेषांना भेट हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. प्राचीन जगातील शिकण्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक ठिकाण पाहण्याची ही संधी होती. एकेकाळी येथे भरभराट झालेल्या अभ्यासपूर्ण भूतकाळाची सखोल झलक हे स्थळ देते. नालंदाने एक बौद्धिक प्रेरणा दिली ज्याने आपला देश सतत विकसित होत आहे”, असे मोदींनी ट्विट केले आहे.