केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी शेअर बाजारासंदर्भात केलेल्या विधानामुळे अमित शहा यांना फटका बसण्याची शक्यता आहे. INDIA आघाडीचे खासदार मंगळवारी सकाळी 11 वाजता सेबीकडे तक्रार करणार असून सेबीकडे तक्रार करायला जाण्यापूर्वी INDIA आघाडीच्या खासदारांनी शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर भेट घेतली. यावेळी तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आणि सागरीका घोष उपस्थित होते. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अरविंद सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होण्यापूर्वी म्हणजे 3 जून रोजी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यामागचं कारण आहे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही एका मुलाखतीत शेअर बाजाराबाबत भाकित केले होते. 4 जून 2024 रोजी शेअर बाजारात तेजी येईल असे ते म्हणाले होते. एक्झिट पोलमध्येही भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे दाखवण्यात आले. त्यामुळे बाजार दोन दिवस ऑल टाईम हायला गेला. परंतु मतमोजणीच्या दिवशी मात्र मोदी-शहांचे भाकित खोटं ठरलं आणि बाजारात घसरण झाली.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल आल्यानंतर शेअर बाजार सर्व विक्रम मोडत शिखरावर पोहोचले असे म्हटले होते. मात्र मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारने लाल बत्ती पेटवली. भाजपला स्पष्ट बहुमत मिळत नाही असा कल येताच बाजार सेन्सेक्स 6000 अंकांनी, तर निफ्टी 2000 आणि बँक निफ्टी 4500 अंकांनी घसरला. कोविड महामारीनंतर पहिल्यांदाच बाजारात एवढी घसरण पहायला मिळाली. अर्थात दुपारनंतर मार्केट थोडं रिकव्हर झालं, मात्र गुंतवणूकदारांचं या घसरणीमुळे प्रचंड नुकसान झालं.
काँग्रेसनं नुकताच शेअर बाजारातील या चढ-उताराला सर्वात मोठा घोटाळा ठरवून जेपीसी चौकशीची मागणी केली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी याप्रकरणी बाजार नियामक सेबीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणीही केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.
मोदी आणि शहांचा स्टॉक मार्केट स्कॅम! राहुल गांधी यांनी बॉम्ब टाकला! सुरुवातच खळबळजनक