काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएमला ब्लॅक बॉक्ससारखी कुणीही तपासू शकत नाही अशी रहस्यमय वस्तू असे म्हटल्यावर, आता निवडणूक आयोगाने सदोष ईव्हीएमचा तपशील जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे जोरहाट मतदारसंघातील खासदार गौरव गोगोई यांनी केली आहे. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयाबद्दल ईव्हीएम हेराफेरीकडे बोट दाखवले जात असताना गोगोई यांनी ही मागणी केली आहे.
ईव्हीएम यंत्रणेने अनेक ठिकाणी चुकीचे निकाल दिले आहेत असे मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो. मतदान आणि मतमोजणी काळातील अशा सदोष ईव्हीएमचा तपशील आयोगाने जाहीर करावा, अशी मागणी गोगोई यांनी सोशल मीडिया एक्सवर केली आहे.
रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर यांच्यातील लढतीनंतर ईव्हीएममधील हेराफेरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.