मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतूक व्यवस्थेतील अडथळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दूर केल्याने वाहन चालकांचा प्रवास पुन्हा वेगवान अन् आरामदायी झाला आहे. सुरक्षित प्रवासासाठी बोगद्याच्या दुतर्फा काही अंतरावर अत्याधुनिक यंत्रसामग्री तैनात केली. याशिवाय दिमतीला ठेकाधारक कंपनीचे शंभरहून अधिक कामगारही कार्यरत आहेत.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग सज्ज असून अपघातप्रवण ठिकाणी सुसज्जता ठेवली आहे. कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्राकडूनही महत्त्वाच्या ‘स्पॉट’वर लक्ष केंद्रित केले आहे. कशेडी बोगद्यात वाहतुकीत कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही यादृष्टीने महामार्ग विभागाने आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंब केला आहे.