
>> प्रसाद नायगावकर
महागाईने अगोदरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दोन वर्षांपासून महागाईने कहर केला आहे. दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. गव्हापासून ते डाळी आणि इतर अनेक वस्तूंनी उच्चांक मोडीत काढलेले आहेत. आता भाजीपाल्याने पण किचन बजेट कोलडमडले. तर इतर भाज्या पण कडाडल्या आहेत. गॅस, पेट्रोल-डिझेलने नाकात दम आणलेला असताना भाजीपाला पण रडवत आहे.तर तूर डाळ 170 रुपये किलो झाली असून सर्वसामान्यांच्या ताटातून आऊट ऑफ कव्हरेज झाली आहे . ” महेंगाई डायन खात जात है ” है गाणं सर्वसामान्यांच्या जीवनात सत्य ठरत आहे .
यवतमाळ जिल्ह्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. टोमॅटो 60 रुपये किलो तर कोथिंबीर 120 किलो रुपयेपर्यंत गेल्याने गृहिणीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या वाढलेल्या उन्हाळ्याचा परिणाम तसेच पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. बाजारात भाजीपाल्याची आवक देखील घटली आहे. यामुळे पालेभाज्या आणि फळ भाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीर 120 रुपये तर टोमॅटो पन्नास ते साठ रुपये किलो दराने विकले जात आहे. या सोबतच हिरवी मिरची आणि फळभाज्यांचे भाव देखील वधारले आहेत. यामुळे सर्वसामान्य गृहिणीचे बजेट कोलमडले असल्याचे चित्र आहे.
सर्वच भाज्यांची आवक घटली असून परिणामी याचा फटका भाज्यांच्या किमतीवर होताना दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या जेवणातून भाजीपाला गायब होत आहे. ग्राहक भाजीपाला खरेदी करीत असताना विचार करून भाजी विकत घेत आहेत. कोथिंबीर, मेथी, शेपू, टोमॅटो, दोडका शिमला मिरची, गोबी यांचे भाव वाढले असल्याने ग्राहक या भाज्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
अवकाळी पावसामुळे वाहतुकी दरम्यान भाजीपाला सडत असल्यामुळे भाजीपाल्यांची आवक घटली आहे. परतीच्या पावसाने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने मार्केटमध्ये हवा तसा भाजीपाला उपलब्ध होत नाही. तसेच आवक घटल्याने मार्केटमध्ये येणाऱ्या जेमतेम भाजीपाल्याला मोठा भाव मिळत असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजीपाला विक्रेते देत आहे .
सिलेंडर सध्या 850रुपयाला मिळत आहे . तूर डाळ इतकी महागली असून डाळीचे वरण करणे आम्ही सोडून दिले आहे .खायचे तेल सुद्धा 150 रुपये प्रति किलो झाले आहे ..जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने खूप ओढाताण होत आहे . घराचे बजेट पूर्ण बिघडले आहे . महिन्या अखेर खर्चाची तोंडमिळवणी कशी करावी हे समजत नाही . पैश्याची बचत करण्याचा विचारही करणे दुरापास्त झाले आहे . पण काय करणार , घर तर चालवावे लागेल.
सोनू कोसेकर ,गृहिणी