प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत

सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले आहे. ही विशेष लोकअदालत 29 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान होणार आहे. लोकअदालतीद्वारे पक्षकारांना जलदगतीने मिळणारा दिलासा लक्षात घेऊन ही योजना आखली आहे.

लोकअदालतीमध्ये तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रकरणातील पक्षकारांसोबत सरकार आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा फायदा आहे. लोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठय़ा प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. न्यायालयातील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे सामंजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता लोकअदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आलेले आहे. यामुळे विशेष लोकअदालतीमार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने लोकअदालतमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची ज्यांची प्रकरणे यादीमध्ये असतील त्यांनी स्वतः अथवा वकिलांमार्फत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई किंवा संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून याचा लाभ पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने (मुंबई) केले आहे. प्रकरणाची यादी https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/MAHARASHTRA.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संपका&साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संपर्क –

– गोंदिया (8591903935) – कोल्हापूर (8591903609) – नांदेड (8591903626) – धाराशीव (8591903625) – रायगड (8591903606) – सातारा (8591903611) – ठाणे (8591903604) – यवतमाळ (8591903629) – नगर (8591903616) – अमरावती (8591903627) – भंडारा (8591903936) – धुळे (8591903618) – जळगाव (8591903619) – रत्नागिरी (8591903608) – सोलापूर (8591903613) z मुंबई (8591903601) – संभाजीनगर (8591903620) – बुलढाणा (8591903628) – गडचिरोली (8591903933) – जालना (8591903621) – नागपूर (8591903931) – नाशिक (8591903615) – पुणे (8591903612) – सांगली (8591903610) – सिंधुदुर्ग (8591903607) – मुंबई उपनगर (8591903602).