धक्कादायक प्रकार उघड; रवींद्र वायकरांच्या मेहुण्याने वापरला EVM अनलॉक करणारा फोन

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र निवडणून आलेल्या शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत कीर्तीकरांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचे ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणासंबंधात मोठा खुलासा झाला आहे. तपासात पंडीलकर ईव्हीएम यंत्राशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मतमोजणीच्या दिवशी केंद्रात मतमोजणी सुरू असताना मंगेश पंडीलकर हे फोनवर बोलताना आढळले. ते ज्या फोनवर बोलत होते, तो फोन ईव्हीएम यंत्राला जोडलेला होता. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी एक ओटीपी जनरेट होतो. हा ओटीपी ज्या फोनवर आला तोच फोन मंगेश पंडीलकर यांच्याकडे असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मतमोजणीच्या दिवशी याच मोबाईल फोनवरुन ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आले असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे. अशी माहिती मिड-डे या वृत्तपत्रात देण्यात आली आहे.

घडलेल्या प्रकाराचा खुलासा झाल्यामुळे वनराई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी मंगेश पडीलकर आणि दिनेश गुरव यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे या दोघांनाही लवकरात लवकर अटक होण्याची शक्यता आहे. तसेच मंगेश पडीलकर याने वापरलेला फोन अधिक तपाासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या फोनमधील कॉल रेकॉर्डसची तपासणी केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले.

चुरशीच्या लढतीत अमोल कीर्तिकरांचा विजय ढापला; वायकर यांचा ‘संशयास्पद’ विजय, पोस्टल मते मोजताना कालाकांडी