शिखर बँक घोटाळय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुटकेला विरोध करण्यासाठी मधेच जागे झालेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी भूमिकेत कोलांटउडी घेतली. थेट पत्रकार परिषदेत प्रकट होत त्यांनी ‘तो मी नव्हेच!’चा दावा केला. अजित पवार यांच्या ‘क्लीन चिट’शी माझा काहीही संबंध नाही. माझ्या नावाचा दुरुपयोग करून काही लोक स्वार्थ साधताहेत, असे स्पष्टीकरण अण्णांनी दिले.
15 वर्षांपूर्वी आवाज उठवला होता!
मी कधी बोलत नाही, बोललो नाही, मात्र माझे नाव आले. मला धक्का बसला. मी 15 वर्षांपूर्वी आवाज उठवला होता. आता या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. अजित पवारांना दिलेल्या ‘क्लीन चिट’संदर्भात ज्यांना माहिती आहे ते बोलतील, असे अण्णांनी स्पष्ट केले.