देऊर रेल्वे गेट दोन दिवसांसाठी बंद

रेल्वेलाइनच्या दुरुस्तीसाठी लोणंद-सातारा महामार्गावरील देऊर (ता. कोरेगाव) येथील रेल्वे गेट क्रमांक 47 हे उद्यापासून (दि. 16) दोन दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे.

वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणंद-सातारा मार्गावरील देऊर रेल्वे गेट क्रमांक 47 हे रुळाच्या दुहेरीकरण व दुरुस्तीसाठी तसेच निरीक्षणासाठी रविवार (दि. 16) सकाळी 6 वाजल्यापासून ते सोमवार (दि. 17) सायंकाळी आठ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गेट बंद असलेल्या दोन दिवसांसाठी सातारा ते लोणंद या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. लोणंद व फलटणकडून येणारी साताऱयाकडे जाणारी वाहने वाठार स्टेशनमधून पिंपोडे बुद्रूक  किंवा वाघोली-अनपटवाडी मार्गे अंबवडे चौकातून सातारा दिशेने जातील. वाठार स्टेशनकडून कोरेगावला जाणारी वाहने तळीये पळशीमार्गे पुढे जातील. सातारा बाजूकडून लोणंदला जाणारी वाहने अंबवडे चौकातून अनपटवाडी -वाठार स्टेशन या मार्गावरून जातील. सातारा व लोणंदकडून येणारी अवजड वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4नेच जातील, असे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी केले आहे.