हा माझा शेवटचा T20 World Cup, न्यूझीलंडच्या खेळाडूचा मोठा निर्णय

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये अनेक धक्कादायक निकाल चाहत्यांनी पाहिले. दिग्गज संघांना दुबळ्या संघानी आस्मान दाखवले. याचाच फटका शांत प्रतिमेच्या न्यूझीलंडला बसला आणि न्यूझीलंडचा संघ तब्बल 37 वर्षांची वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत बाहेर पडला. अशातच न्यूझीलंडला आणखी एक मोठा धक्का बसला असून वेगवगान गोलंदाज ट्रेंट बोल्टने टी20 वर्ल्ड कपमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

न्यूझीलंडने केलेल्या खराब कागमिरीमुळे टी20 वर्ल्ड कप 2024 मधून त्यांचा पत्ता कट झाला. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरिकडे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी तीन-तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये आपली जागा पक्की केली. न्यूझीलंडच्या या खराब कामगिरीमुळेच ट्रेंट बोल्टने निवृत्तीची घोषणा केल्याची क्रीडा वर्तृळात चर्चा आहे. असे असले तरी पुढील टी20 वर्ल्ड कपमध्ये ट्रेंड बोल्ट न्यूझीलंडकडून खेळताना दिसणार नाही.

न्यूझीलंडचा साखळी फेरीतील तिसरा सामना युगांडा विरुद्ध झाला. या सामन्यात जिंकल्यानंतर 34 वर्षीय बोल्टने आपल्या भावना व्यक्त केल्या. “मला फक्त एवढचं म्हणायच आहे की, हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप आहे. आम्हाला अशा पद्धतीची सुरुवात अपेक्षित नव्हती. हे पचवण खूप अवघड आहे. स्पर्धेत पुढे जाऊ न शकल्यामुळे आम्ही सर्व निराश आहोत. परंतू जेव्हा तुम्हाला देशासाठी खेळण्याची संधी मिळते तेव्हा ती एक अभिमानाची गोष्ट असते”, अस म्हणत ट्रेंट बोल्टने आपण पुढील टी20 वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा साखळी फेरीतील शेवटचा सामना 17 जून रोजी पापुआ न्यु गिनी विरुद्ध होणार आहे. हा सामना ट्रेंट बोल्टचा टी20 वर्ल्ड कपमधील शेवटचा सामना असणार आहे.