जगभरातून महत्वाच्या बातम्या

हिंदुस्थानला आणखी 26 राफेल मिळणार

हिंदुस्थानी लष्कराला आणखी 26 राफेल मिळणार आहेत. राफेल विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्ससोबत चर्चा सुरू आहे. हिंदुस्थान आणि फ्रान्स यांच्यात 30 मे रोजी एक बैठक होणार होती, परंतु ही बैठक या महिन्यात होणार आहे. 26 राफेल खरेदीसाठी 50 हजार कोटी रुपयांचा सौदा केला जाणार आहे.

उन्हामुळे शाळांच्या सुट्टय़ा वाढवल्या

उत्तर प्रदेशात सध्या भीषण गर्मी आहे. त्यामुळे सरकारने शाळांच्या सुट्टय़ा 24 जूनपर्यंत वाढवल्या आहेत. तसेच मुलांचे कॉलेज आता 30 जूनपर्यंत बंद असणार आहेत. उन्हामुळे शाळांच्या सुट्टय़ा वाढवण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. सुट्टय़ा वाढवण्यासंबंधी महासंचालक पंचन वर्मा यांनी माहिती दिली.

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रावर फसवणुकीचा आरोप

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज पुंद्रावर एका सराफा व्यापाऱयाने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोघांविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. व्यापारी पृथ्वीराज कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राजपुंद्रा यांच्याविरोधात तक्रार केली होती.

चार वन कर्मचाऱयांचा होरपळून मृत्यू

उत्तराखंडच्या अल्मोडा जंगलेल्या आगीत चार वन कर्मचाऱयांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. हे कर्मचारी आग विझविण्यासाठी जंगलात गेले होते. या आगीत चार जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना एअरलिफ्ट करून ऋषिकेश एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अयोध्येतील राममंदिरावर  हल्ल्याची धमकी

अयोध्येतील श्री राममंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिली आहे. नुकताच एक ऑडिओ व्हायरल झाला असून यात आमिर नावाच्या दहशतवाद्याने आमची मशीद पाडून मंदिर बांधण्यात आले. आता हे मंदिर बॉम्बने उडवण्यात येईल, अशी धमकी हा दहशतवादी देताना दिसत आहे.

एक्स्प्रेसमध्ये आग

लखनौहून चंदिगढला जाणाऱया एक्स्प्रेसमध्ये मोठी दुर्घटना टळली. बिजनौरच्या चंदक स्टेशनवर पोहोचण्याआधी एक्स्प्रेसच्या चाकातून आग लागली. तसेच कोचमध्ये धूर पसरल्याने प्रवासी घाबरले होते.

ऋषी सुनक जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीची चर्चा

इटलीमध्ये जी-7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. इटलीत जगभरातील दिग्गज नेते जमले असून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी स्वतः दाखल होणाऱया प्रत्येक नेत्याचे स्वागत करत आहेत. अशातच जॉर्जिया मेलोनी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा व्हिडियो चांगलाच चर्चेत आलाय.

मक्कात 15 लाख हज यात्री

जगभरातील 15 लाख हज यात्री हे मक्का या ठिकाणी पोहोचले आहेत. या महिन्यातील अखेरच्या मंगळवारपर्यंत या ठिकाणी 15 लाख हजयात्री पोहोचल्याची माहिती सौदी अधिकाऱयांनी दिली. 14 ते 19 जूनपर्यंत हजयात्रा सुरू असणार आहे.