अमित शहा भाजपच्या महिल्या नेत्यावर चिडले? स्टेजवरच्या व्हायरल व्हिडीओवर आलं स्पष्टीकरण

Tamilisai-Soundararajan-amit-shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या महिला नेत्या तमिलिसाई सौंदर्यराजन यांच्यात स्टेजवरच काही संवाद झाला यावेळी शहा यांच्या चेहऱ्यावर रागिट भाव दिसत आहेत. यामुळे त्यांच्यात वाद झाल्याचे म्हणत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी तमिलिसाई सौंदर्यराजन पुढे आल्याअसून त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सौंदर्यराजन यांनी गुरुवारी सांगितलं की पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी त्यांना ‘राजकीय आणि मतदारसंघाचे काम तीव्रतेने करण्यास सांगितलं’.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी झाल्याच्या व्हिडीओ क्लिपमध्ये, शहा बोटाने हातवारे करत सुंदरराजन यांच्याशी रागात बोलत असल्याचं वाटत आहे.

गुरुवारी संध्याकाळी X वर एका पोस्टमध्ये, सौंदर्यराजन, ज्या तेलंगणाच्या माजी राज्यपाल आहेत, म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मी पहिल्यांदाच अमित शहा यांना भेटले आणि आमच्यात पोस्ट-पोल फॉलोअपबद्दल बोलणं झालं.

‘काल मी आमचे माननीय गृहमंत्री अमित शहा जी यांना 2024 च्या निवडणुकांनंतर प्रथमच आंध्र प्रदेशमध्ये भेटले. तेव्हा त्यांनी मला पोस्ट पोल फॉलोअप आणि भविष्यातील चॅलेंजेसबद्दल विचारण्यासाठी बोलावले.

‘मी सविस्तरपणे सांगत होते पण वेळेच्या कमतरतेमुळे त्यांनी थोड्याशब्दात मला राजकीय आणि मतदारसंघातील काम अधिक गतीनं पार पाडण्याचा सल्ला दिला. हे सर्वस्पष्टीकरण उगाच सुरू असलेल्या अनुचित अंदाजाना रोखण्यासाठी पुरेसे आहे’, असं त्या म्हणाल्या आहेत.

सौंदराराजन यांनी दक्षिण चेन्नई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. द्रमुकच्या तमिझाची थंगापांडियन यांच्याकडून त्या निवडणुकीत पराभूत झाल्या.

भाजपच्या तमिळनाडू युनिटमध्ये पक्षांतर्गत संघर्षाच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे स्पष्टीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे.

बुधवारी चेन्नईला परतल्यावर सौंदर्यराजन यांनी शहा यांच्याशी झालेल्या संवादाबाबत पक्षातील मतभेदाच्या दाव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता भाष्य करण्यास नकार दिला होता.