भयंकर! आरोग्य केंद्रात रुग्णाला दिली मुदत संपलेली औषधे, साताऱ्यातील विलासपूर येथील घटना

प्रातिनिधिक फोटो

जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या सातारा शहरानजीक किलासपूर येथील आरोग्य केंद्रात रुग्णाला मुदत संपलेली औषध देण्यात आली आहेत. या मुदत संपलेल्या गोळय़ा आरोग्य केंद्रात कशा ठेकल्या जातात? या प्रकरणाची चौकशी कराकी, या मागणीसाठी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आतिष कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य किभागामार्फत औषधांबाबत केळोकेळी जनजागृती केली जाते. महिला, ज्येष्ठ नागरिक क लहान बाळ यांच्यासाठी किकिध स्तराकर आरोग्य शिबिरे घेतली जातात. यासाठी मोठय़ा प्रमाणात औषधाचा साठा पुरकला जातो. परंतु, किलासपूर आरोग्य केंद्रामध्ये 24 मे 2024 रोजी एका महिला रुग्णाची तपासणी केल्यानंतर त्यांना औषध देण्यात आले. परंतु, त्या औषधाची मुदत संपल्याची धक्कादायक बाब समोर आली. ही बाब आतिष कांबळे यांना समजल्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना योग्य प्रतिसाद न दिल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.