यूपीएससी परीक्षार्थींना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (यूपीएससी) 16 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांनी परीक्षा पेंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मुंबई शहर जिह्यात एकूण 36 परीक्षा पेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी एकूण 14 हजार 509 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. सदर परीक्षा ही दोन सत्रांत होणार आहे. पहिल्या सत्राची वेळ सकाळी 9.30 ते 11.30 (पेपर – 1) आणि दुसऱया सत्राची वेळ दुपारी 2.30 ते 4.30 (पेपर – 2) अशी आहे. परीक्षार्थींनी आपल्या नेमून दिलेल्या परीक्षा पेंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास आधी हजर राहणे अनिवार्य केले आहे. मुंबई शहर जिह्यातील सर्व परीक्षार्थ्यांनी पेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार परीक्षा पेंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिल्या आहेत.