
UEFA EUROs ही स्पर्धा रविवार 14 जून 2024 ते 14 जुलै 2024 या कालावधीत पार पडणार असून, या स्पर्धेचे आयोजन जर्मनी करणार आहे. हिंदुस्थानातील फुटबॉल प्रेमींना सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क तर्फे पाहता येणार आहे. याकरीता त्यांच्या लाईव्ह स्टुडिओ शो फुटबॉल एक्स्ट्रासाठी एका एक्सपर्ट पॅनलची घोषणा करण्यात आली आहे.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने एक्सपर्ट्स पॅनलमध्ये समाविष्ट असणाऱ्या दिग्गज खेळाडूंची नावे जाहिर केली आहेत. ज्यामध्ये फ्रान्सचा माजी कर्णधार पॅट्रिक एव्ह्रा, हिंदुस्थानचा माजी कर्णधार सुनील छेत्री, आणि बायचुंग भुतिया, सध्याचा हिंदुस्थानी संघाचा असलेला कर्णधार आणि गोलरक्षक गुरूप्रीत सिंग सिंधू, माजी फॉरवर्ड रॉबिन सिंह आणि माजी आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू डेव्हिड जेम्स, डॉन हचिसन, टेरी फेलन, अॅशली वेस्टवुड आणि मार्क सिव्हरव्हज यांचा समावेश असणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या स्पर्धेतील सर्व LIVE अॅक्शन इंग्रजी, हिंदी, मल्याळम, तेलगू, तमिळ आणि बंगाली भाषेत तुमच्या समोर घेऊन येणार आहे. ‘होम ऑफ फुटबॉल इन इंडिया’ इंग्रजीमध्ये Sony Sports Ten 2 SD & HD, हिंदीमध्ये Sony Sports Ten 3 SD & HD, तमिळ आणि तेलगूमध्ये Sony Sports Ten 4 SD & HD आणि बंगाली आणि मल्याळममध्ये Sony Sports Ten 5 SD & HD वर UEFA EURO 2024 चे बहुप्रतिक्षित LIVE प्रसारण करेल.