देशात प्रादेशिक पक्षांनी रोखला लोकसभेत भाजपच्या विजयाचा वारू

महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी, बंगालमध्ये तृणमूल, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, तामिळनाडूत डीएमके प्रभावी

लोकससभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपच्या विजयाचा वारू रोखण्यात इंडिया आघाडीला मोठ यश आले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, तृणमूल कॉँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके या प्रादेशिक पक्षांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडूत महत्त्वाची भूमिका बजावली. परिणामी 400 पारचा नारा देणाऱया भाजपला स्वबळावर सत्तेत येण्याचे स्वप्न भंगल्याने नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांचा टेकू पेंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी घ्यावा लागला.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱया कॉँग्रेसला 99 जागांवर यश मिळाले. त्या तुलनेत इंडिया आघाडीचे घटक पक्ष असणाऱया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पार्टी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेस आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन यांच्या नेतृत्वातील डीएमके या पक्षांची कामगिरी अधिक प्रभावी ठरल्याचे देशभरातील निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरू दिसून येत आहे.

महाराष्ट्रात विरोधक ठरले सरस

पेंद्रात तिसऱयांदा सत्तेत येण्यासाठी 400 पारचा नारा देणाऱया भाजपने महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले होते. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात लढणारे शिवसेना, राष्ट्रवादी हे प्रादेशिक पक्ष सरस ठरले. भाजपच्या पह्डापह्डीच्या राजकारणातून पक्षात पडलेल्या फुटीनंतर नवे चिन्ह घेऊन लोकसभेच्या लढाईत उतरलेल्या शिवसेनेने 9, राष्ट्रवादीने 8 जागा जिंकल्या. तर मागच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून केवळ एक जागा जिंकणाऱया कॉँग्रेसला मित्रपक्षांच्या साथीने 13 जागा जिंकता आल्या.

इंडिया आघाडीत सर्वाधिक जागा लढवणाऱया काँग्रेसने काही अपवाद वगळता हिंदी पट्टय़ात भाजपच्या विरोधात फारशी चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या क्षणी अखिलेश यादव यांच्यासोबत कॉँग्रेसने केलेल्या हातमिळवणीमुळे भाजपच्या विजयाचा वारू रोखण्यास मदत झाली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलसोबत कॉँग्रेसची बोलणी फिसकटली. स्वबळावर लोकसभेच्या 29 जागा जिंकत भाजपला रोखण्याची किमया ममता बॅनर्जी यांनी केली.

कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या तिन्ही काँग्रेसशासित राज्यांमध्ये विधानसभेच्या विजयाचा स्ट्राईक रेट कायम ठेवण्यात काँग्रेस अयशस्वी ठरली. कर्नाटकात कॉँग्रेसला 9 जागा मिळाल्या.

काँग्रेस-भाजपमध्ये झालेल्या थेट लढाईत हरियाणामध्ये 5 आणि राजस्थानमध्ये 8 जागा कॉँग्रेसला जिंकता आल्या. मध्य प्रदेश, गुजरात, झारखंडमध्ये भाजपला रोखण्यात कॉँग्रेस अपयशी ठरली.