कुवेतमध्ये आगीचा भडका; 40 हिंदुस्थानी ठार

कामासाठी कुवेतमध्ये गेलेल्या 40 हिंदुस्थानी लोकांचा इमारतीला लागलेल्या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. क्षमतेपेक्षा कितीतरी पट अधिक कामगार या इमारतीत राहत होते. कुवेतचे उपपंतप्रधान शेख फहाद युसेफ सौद अल-सबाह यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण हिंदुस्थानी असून कामानिमित्त ते कुवेतला गेले होते. या आगीत 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कुवेतमधील मंगाफ शहरात सकाळी 6 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. पहाटेच्या सुमारास इमारतीला भीषण आग लागली. आगीमुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही. ते इमारतीत अडकले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. या इमारतीत अनेक स्थलांतरित मजूर राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. कुवेतचे गृहमंत्री शेख फहद अल-युसूफ अल-सबाह यांनी इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत 160 हून अधिक लोक राहत होते. या इमारतीत अनेक लोक बेकायदेशीरपणे राहत होते, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. जास्त भाडय़ाच्या लालसेपोटी इमारतीचे मालक एकाच खोलीत अनेकांना बसवतात, त्यांच्याकडून भरमसाठ भाडे आकारतात. त्यामुळे इमारतींची सुरक्षा व्यवस्था कोलमडते, असेही गृहमंत्री म्हणाले.

कुवेतमध्ये झालेल्या अपघातामुळे मला धक्का बसला आहे. त्या ठिकाणी जवळपास 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. कुवेतमधील आगीच्या घटनेचा तपशील बाहेर येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. हिंदुस्थानी राजदूत घटनास्थळी रवाना झाले आहेत. ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले आहेत त्यांच्यासाठी मी शोक व्यक्त करतो, असे हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

हेल्पलाईन क्रमांक जारी

कुवेतमधील आगीच्या घटनेनंतर हिंदुस्थानी दूतावासाने +965-65505246 हा हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे. कोणाला काही अपडेट हवी असेल तर या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी साजऱया होणाऱया बकरी ईद सणानिमित्त देवनारच्या कत्तलखान्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून शेकडो बोकड विक्रीसाठी आले आहेत. या बोकडांची पिंमत तब्बल 22 लाख, 10 लाख आणि 9 लाखांपर्यंत आहे.