>> प्रसाद नायगावकर
मिशीला पीळ देण्याच्या व्यतिरिक्त कुठलेही काम न करणाऱ्या केळापूरचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी आता मिशी काढून टाकून त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करावी असा जबरदस्त टोला महाविकास आघाडीच्या नवनियुक्त खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संदीप धुर्वे यांना दिला आहे .
पाच वर्षात खासदार बाळु धानोरकर यांनी आर्णी विधानसभेत कुठलीही विकास काम केले नाही त्यामुळे विकास काम दाखवा मी मिशी काढतो अशी प्रतिज्ञा आमदार संदीप धूर्वे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात केली होती. नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतला आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा खरपूस समाचार घेतला . चंद्रपूर वणी लोकसभा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल 2 लाख 60 हजार मतांनी पराभव केला .
आर्णी विधानसभेसह सर्वच ठिकाणी विकास काम केल्याने जनतेने भरभरून मतदान केले लीड दिला त्यामुळे आता आमदार संदीप धुर्वे यांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करावी आणि मिशी काढून टाकावी असही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटल आहे . त्यामुळे आता आर्णी भाजप आमदार संदीप धुर्वे मिशी काढणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आता या विधानसभा मतदारसंघात लीड मिळाली आहे, त्यामुळे आमदार धुर्वे यांनी मिशी काढून टाकावी म्हणजे त्यांना दुसरे काम राहणार नाही, असा सणसणीत टोलाही खासदार धानोरकर यांनी लगावला आहे.