INDIA च्या विरोधी आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपला यंदा स्वबळावर बहुमत गाठता आलं नसून निवडणुकीच्या NDA च्या नावाखाली नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची सोबत घ्यावी लागली आहे. आता निवडणूक निकालातील आकडेवारीवरून विविध प्रकारे विश्लेषण करण्यात येत आहे. त्यांच्यापैकी एक माहिती अशी समोर येत आहे की INDIA आघाडीतील प्रादेशिक मित्रपक्षांनी अधिक प्रभावी भूमिका बजावत काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच भाजपचं स्वबळावर सत्तेत येण्याचं स्वप्न भंगलं आहे.
त्या तुलनेत, INDIA आघाडीत मित्रपक्षांमध्ये सर्वाधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसनं काही अपवाद वगळता हिंदी पट्ट्यातील भाजपच्या विरोधात फारशी चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळत नाही, असं काही विरोधी नेत्यांनी सांगितलं. काँग्रेसने डावे, काही प्रादेशिक पक्षांना पराभूत करून आणि चांगली कामगिरी करणाऱ्या मित्रपक्षांच्या जोरावर जागा जिंकल्या आहेत.
अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपा, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील AITMC, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP (SCP) यांसारख्या INDIA आघाडीतील सहयोगी पक्षांची चमकदार कामगिरी ही भाजपला रोखण्यात अधिक कार्यक्षम ठरली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या तीन सर्वात मोठ्या आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांवर भाजप चांगल्या निकालांसाठी सर्वशक्तीनिशी उतरला होता.
UP मध्ये SP च्या 37 जागा (काँग्रेस सहा जागांसह समर्थनाच्या भूमिकेत), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे पक्ष अनुक्रमे नऊ आणि आठ जागांसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या लढतीची कमान घेत आहेत – त्यांच्या पक्षांमध्ये फूट पडूनही आणि त्यांची चिन्हे आणि ओळखली जाणारी नावे गमावूनही त्यांनी केलेली कामगिरी दमदार आहे. तृणमूलने पश्चिम बंगालमध्ये भाजपला 29 जागा जिंकून मागे ढकलण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
काँग्रेसकडे महाराष्ट्रात 13 जागा आहेत कारण त्यांनी जास्त जागा लढवल्या, पण पवार आणि ठाकरे यांची उंची गाठतील असे स्थानिक नेते येथे नव्हते. बंगालमध्ये, काँग्रेसने तृणमूल आणि भाजप या दोन्ही पक्षांशी लढताना सीपीएम (0) च्या सोबतीनं अवघी एक जागा मिळवली.
त्या तुलनेत, कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या तिन्ही काँग्रेसशासित राज्यांमध्ये पक्ष आपल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा स्ट्राइक रेट जुळवण्यात काँग्रेस अयशस्वी ठरली आणि तिथे भाजपची कामगिरी चांगली ठरली.
कर्नाटकात, भाजपच्या 17 विरुद्ध काँग्रेस फक्त नऊ जागा जिंकू शकली, त्यामुळे भाजप 2019 च्या 25 च्या तुलनेत खूप खाली घसरेल या विरोधकांच्या अपेक्षेवर परिणाम झाला. तेलंगणात काँग्रेसला भाजपसोबत प्रत्येकी आठ जागा मिळाल्या, हिमाचलमध्ये पक्षाचा 0-4 असा पराभव झाला.
आणि इतर काँग्रेस-भाजप थेट द्वंद्वयुद्धात, हरियाणा (5-5) आणि राजस्थान (8-14) मध्ये थोडी फार चांगली कामगिरी वगळता, काँग्रेस मध्य प्रदेश (0-29), गुजरात (1-25), झारखंडमध्ये भाजपला पराभूत करण्यात अपयशी ठरली. छत्तीसगड (1-10), उत्तराखंड (0-5), आसाम (3-9), अरुणाचल प्रदेश (0-2), आणि जम्मू (0-2). गोव्यात काँग्रेसने भाजपशी 1-1 अशी बरोबरी साधली आणि मणिपूरमध्ये भाजपला 2-0 ने पराभूत केलं.
10 वर्षांच्या मोदी राजवटीत काँग्रेसशी थेट लढ्यात असलेले हे भाजपचे वर्चस्व हे स्पष्ट करते की, उत्साहपूर्ण मूड असूनही, लोकसभा निवडणुकीत पक्षानं निचांक गाठला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या दोन भारत जोडो यात्रेचा केंद्रबिंदू या भागात भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी तयार करण्यात आला होता, परंतु त्याचा परिणाम जमिनीवर पुरेसा झाला नाही हे दिसून येत आहे.
याउलट, भाजप कमकुवत असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसने इतर पक्षांविरुद्ध चांगली कामगिरी केली – केरळमध्ये 14 आणि पंजाबमध्ये सात जागा जिंकल्या.
बिहार आणि दिल्लीत काँग्रेस आणि मित्रपक्ष (आरजेडी आणि आप) भाजपच्या विरोधात एकत्र येऊनही घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
अंतिम तक्त्यामधील भाजप 240 आणि त्यातुलनेत काँग्रेस 99 हे कमालीचे अंतर स्पष्ट दिसत आहे. म्हणजेच स्वबळावर भाजपकडून जागा मिळवण्यात काँग्रेसचे अपयश हे देखील पुन्हा एकदा अधोरेखित होत असल्याचं विरोधी नेत्यांचं म्हणणं आहे.
बऱ्याच विरोधी नेत्यांना असं वाटतं की काँग्रेसने भाजपच्या विरोधात चांगली कामगिरी केली असती आणि INDIA आघाडीच्या प्रादेशिक बड्या पक्षांशी जुळवून घेतलं असतं तर कदाचित या निवडणुकीत त्यांनी NDA चा पाडाव केला असता.