जामखेड–खर्डा रोडवरील बटेवाडी शिवारात पेट्रोल पंपाजवळ देवदर्शनाहून परतणाऱया तरुणांच्या चारचाकी वाहन व एसटी बसमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अक्कलकोट, तुळजापूर येथून देवदर्शन करून परतत असताना जामखेडजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील पाचहीजण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावचे रहिवासी आहेत. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विजय गंगाधर गव्हाणे (वय 24), पंकज सुरेश तांबे (वय 24, दोघेही रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आज उपचारादरम्यान मयूर संतोष कोळी (वय 18) याचा मृत्यू झाला.
सचिन दिलीप गीते (वय 30) व अमोल बबन डोंगरे (वय 28, तिघे रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) हे दोघे जखमी असून, त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोपरगाव डेपोची शिर्डी-हैदराबाद ही एसटी चालक सचिन विष्णू राऊत हे प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे चालले होते. अक्कलकोट व तुळजापूर येथून देवदर्शन करून पाच तरुण मोटारीतून नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावी चालले होते. सोमवार (दि. 10) मध्यरात्री एसटी बस व मोटारीची जामखेड-खर्डा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ धडक झाली. यामध्ये विजय गव्हाणे, पंकज तांबे यांचा मृत्यू झाला. तर मयूर संतोष कोळी (वय 18), सचिन दिलीप गीते (वय 30) व अमोल बबन डोंगरे (वय 28, तिघे रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) या जखमी तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज जखमी मयूर कोळी याचा मृत्यू झाला. एसटी चालक सचिन विष्णू राऊत याला अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली आहे.