ठोशास ठोसा! हिंदुस्थान बदलणार तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे, चीनला त्यांच्याच भाषेत देणार उत्तर

हिंदुस्थानच्या सीमेवरील वातावरण शांत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. पाकड्यांच्या कुरापती सुरूच आहेत. दहशतवाद्यांना खतपाणी घालत कश्मीर खोरे अशांत करण्याच्या त्यांच्या कुरापती सुरूच आहेत. तर अरुणाचल प्रदेश आणि लडाखवर चीन आपला दावा सांगत आहे. देशात लोकशाही निवडणुका सुरू असताना चीनने सामेलगत गावे वसवली असल्याचे वृत्त आहे. तसेच हिंदुस्थान आणि तिबेटमधील प्रदेशांची गावांची नावे बदलण्याच्या कुरापतीही सुरू आहेत. आता या चिनी लाल माकडांना हिंदुस्थान त्यांच्याच शब्दांत उत्तर देण्याच्या तयारीत आहे.

अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील चीनच्या कारवायांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेल आली आहे. हिंदुस्थानने तिबेटमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी पदभार स्वीकारल्यावर चीनसोबत सुरु असलेला सीमावाद सोडवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार आता हिंदुस्थानने तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे बदलण्यास मान्यता दिली आहे. ऐतिहासिक महत्त्व आणि तिबेटी संस्कृतीचा विचार करच ही नावे देण्यात येणार आहेत. हिंदुस्थानी लष्कराकडून नावे जाहीर केली जातील त्यानंतर ही नावे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या नकाशावर अद्यायावत केली जातील.

चीनने एप्रिल महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील 30 ठिकाणांची नावे बदलली. त्यावेळी, चीनच्या निर्णयाचा हिंदुस्थानने तीव्र निषेध केला होता. आता हिंदुस्थानही चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सज्ज झाल्याचे वृत्त आहे. चीनकडून वारंवार दावे करुनही अरुणाचल प्रदेश हा देशाचा अविभाज्य भाग असल्याचे हिंदुस्थानने ठणकावून सांगितले आहे.