मुस्लिम समाजासाठी हज हे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी जगभरातील मुस्लिम व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत येत असतात. परंतु या ठिकाणी बुरखा घातलेल्या एका महिलेने डान्स केल्याने जगभरातील मुस्लिम राष्ट्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बुरखा घातलेली ही महिला मक्कातील काबासमोर डान्स करत आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जगभरातील मुस्लिम मक्कात पोहोचल्यानंतर काबाकडे तोंड करत असतात. त्यांच्यासाठी हे पवित्र आणि इस्लाम धर्माच्या दृष्टीने अत्यंत धार्मिक स्थळ आहे. परंतु महिलेच्या या डान्सनंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काबासमोर हजारो मुस्लिम दिसत आहे. या ठिकाणी एक महिला मात्र डान्स करत आहे. यावरून सोशल मीडियावर वातावरण तापले आहे. डान्स करणाऱया महिलेवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु ही महिला नेमकी कोण आहे, हे अद्याप समजू शकले नाही.