Breaking News – एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

मुंबई क्रिकेट असोशिएशनचे( एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे अमेरिकेत निधन झाले आहे. रविवारी झालेल्या टीम इंडिया- पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याला ते उपस्थित होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. काळे यांनी रविवारी रात्री एमसीएच्या पदाधिकाऱ्यांसह न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधून टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना थेट पाहिला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि सर्वोच्च परिषदेचे सदस्य सूरज सामंत यांच्यासह काळे यांनी रविवारी स्टेडियममधून टी-20 विश्वचषकाचा टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना आणि त्यातील टीम इंडियाच्या विजयाचा आनंद घेतला. ऑक्टोबर 2022 मध्ये संदीप पाटील यांचा निकराच्या लढाईत पराभव केल्यानंतर काळे यांची मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आगामी मोसमापासून मुंबईच्या वरिष्ठ क्रिकेटपटुंचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी मोठा वाटा उचलला.

मूळचे नागपूरचे असलेले काळे हे एक दशकाहून अधिक काळ मुंबईत स्थायिक होते. एमसीएच्या कारभाराचे नेतृत्व करण्याबरोबरच काळे हे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे सह-प्रवर्तक देखील होते.