मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानच्या दुसऱया बोगद्याचे सोमवारी उद्घाटन होणार असून मंगळवारपासून हा बोगदा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी असा प्रवास केवळ 9 मिनिटांत करता येणार आहे. दरम्यान, ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत अशी 16 तास खुली ठेवली जाणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवली जाणार आहे.