गूगल पे बाबत मोठी बातमी… वाचा काय आहे अपडेट

गूगल पे मुळे सध्या व्यवहार करणे अत्यंत सोप्पे झाले आहे. त्यामुळे लोकांचे रोख व्यवहार कमी होऊन आता गूगल पे जास्त वापरले जात आहे. मात्र आता गूगल कंपनी ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. गूगल कंपनी अमेरिकेत ‘गुगल पे’ आणि ‘गुगल व्हीपीएन’ सेवा बंद केली आहे. त्यामुळे लाखो ग्राहकांना फटका बसणार आहे, मात्र हिंदुस्थानातील ग्राहकांनी टेन्शन घेण्याचे कारण नाही. कारण हिंदुस्थान आणि सिंगापूरमध्ये ‘गुगल पे’ सुरू राहणार आहे.

.अमेरिकेत ‘गुगल पे’ऐवजी ‘गुगल वॉलेट’ सेवा दिली जाणार आहे. हिंदुस्थानात ‘गुगल पे’ आणि ‘गुगल वॉलेट’ या दोन्ही सेवा स्वतंत्रपणे काम करतील.