मुंबई आणि उपनगरात आर्द्रता वाढल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत. त्यांना आता दिलासा मिळणार आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच येत्या आठवड्याभरात मॉन्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.
सर्वजण आतुरतेने मॉन्सूनची वाट बगत होते. गेल्यावर्षीसारखा यंदाही मॉन्सून कोकणात दोन दिवस रेंगाळला होता. आता त्याचे मुंबईत आगमन झाले आहे. त्यामुले उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी शनिवारी रिमझिम सरी बरसल्या. तर पहिल्याच पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले. कोकणातही पावसाने दमदार बॅटिंग केली आहे.
आता पुढील पाच दिवस मुंबई, उपनगरात, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आर्द्रता वाढल्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या मुंबईत ऊकाडा जाणवत आहे. मॉन्सूनचे आगमन झाले तरी पाऊस का येत नाही तसेच उकाडाही कमी होत नसल्याने मुंबईकर घामांच्या धारांनी त्रस्त होते. आता त्यांना दिलासा मिळणार आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याने तापमानात घट होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयाला रविवारसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जिल्हयांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसायटयाचा वारा वाहील आणि पाऊस पडण्याचा अंदाज आहे.