देशभरातून महत्वाच्या बातम्या

हिंदुस्थानी लष्कराला मिळाले 355 नवे अधिकारी

देहरादून येथील हिंदुस्थानी सैन्य अकादमी (आयएमए) येथून 355 तरुणांनी पास आऊट केले. हे सर्व जण आता हिंदुस्थानी लष्करात अधिकारी पदावर रूजू होतील. 154 व्या नियमित आणि 137 व्या टेक्नोलॉजी पदवी कोर्सची पीओपी शनिवारी सकाळी आयएमए येथे झाली. या वेळी पास आऊट झालेल्या तरुणांच्या चेहऱयावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

रील्समुळे तरुणीला एचआरची नोटीस

ऑफिसात काम सोडून इन्स्टाग्राम रील्स, नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहणाया एका तरुणीला एचआर विभागाने एक नोटीस पाठवली आहे. एचआरने तरुणीला दिलेली नोटीस सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. कामाच्या वेळेत एका महिला कर्मचायाला इन्स्टाग्राम, नेटफ्लिक्स, अजीओ या शॉपिंग वेबसाइट आणि नोकरीसारख्या जॉब सार्ंचग प्लॅटफॉर्मचा वापर करताना अन्य कर्मचायांनी पाहिले आणि त्यांनी एचआरकडे तक्रार केली. यावर एचआर विभागाने या तरुणीला नोटीस पाठवली. नोटीसीत म्हटले की, तुम्ही पंपनीचा वेळ, वीज आणि इंटरनेट वापरून पंपनीचे नुकसान केले आहे. कामाच्या वेळेत पंपनीचे काम करणे अपेक्षित आहे. परंतु, तुम्ही डयुटीचा वेळ अन्य कामांवर खर्ची घालत आहात. अजिओवर तुम्ही जवळजवळ सहा तास वेळ घालवला, हे चुकीचे आहे, असेही पंपनीने आपल्या नोटिशीत म्हटले आहे.

दिल्लीत आजपासून नो फ्लाइंग झोन

मोदींच्या शपथविधीसाठी राजधानी दिल्लीत त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात येणार असून दिल्ली पोलिसांनी 9 आणि 10 जून रोजी दिल्लीत नो फ्लाइंग झोन जाहीर केले आहे. या दरम्यान पॅराग्लाइडर, पॅरा-मोटर्स, हँग ग्लाइडर, यूएवी, यूएएस, हॉट एअर बलून, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट आणि रिमोटद्वारे चालणाऱया विमानांच्या उड्डाणांना दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे. संवदेनशील परिसरात ड्रोनद्वारे होणाऱया हालचालींना बंदी घातली आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षारक्षकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोणत्याही अनधिकृत वाहनांना परिसरात प्रवेशासाठी बंधने घालण्यात आली आहेत.

अस्थमाच्या चमत्कारिक गोळीसाठी लोकांची झुंबड

कर्नाटकाच्या कोप्पल जिह्यातील कुटागनहल्ली या गावात अस्थमा (दमा) वर चमत्कारी गोळी घेण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली. या ठिकाणी अशोक राव कुलकर्णी यांनी बनवलेली दम्यावरील गोळी घेण्यासाठी कर्नाटकमधील, महाराष्ट्र आणि दक्षिण हिंदुस्थानातील अनेक राज्यांतून लोक या ठिकाणी आले. हे औषध घेण्यासाठी या गावात जत्राच भरली असून या ठिकाणी अनेक विव्रेत्यांनी आपली दुकानेसुद्धा थाटली आहेत.

सोमवारपासून अॅपलचा इव्हेंट

अॅपलचा वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्स (डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2024) इव्हेंट उद्या सोमवारपासून सुरू होणार आहे. हा इव्हेंट 10 जूनपासून सुरू होणार असून 14 जूनपर्यंत चालणार आहे. अॅपल कंपनी या इव्हेंटमध्ये आयफोन, आयपॅड, अॅपल वॉच, अॅपल टीव्ही, होमपॉड, एअरपॉड्स, अॅपल व्हिजन प्रो आणि मॅकसाठी नवीन
ऑपरेटिंग सिस्टम लाँचिंग करण्याची शक्यता आहे. कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्ससंबंधी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. 10 जून रोजी रात्री 10.30 वाजता या इव्हेंटची सुरुवात होईल. हा इव्हेंट अॅपलच्या यूटय़ूब चॅनेल आणि वेबसाईटवर लाइव्ह पाहता येईल.

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर कोपनहेगनमध्ये एका व्यक्तीने अचानक हल्ला केला. हा हल्ला युरोपियन युनियन (ईयू) निवडणुकीपूर्वी झाला आहे. ईयूच्या निवडणुका 9 जून रोजी होणार आहेत. डॅनिश पंतप्रधान फ्रेडरिक्सन सोशल डेमोव्रॅट्सच्या ईयू आघाडीच्या उमेदवार क्रिस्टेल शाल्डेमॉस यांच्यासोबत प्रचार करत आहेत. घटनेच्या वेळी त्या प्रचार आटोपून परतत होत्या. त्या वेळी आरोपीने मागून येऊन फ्रेडरिक्सन यांना जोरात धक्का दिला. त्यामुळे त्या अडखळल्या. मात्र कोपनहेगन पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

बस कंडक्टरने वाचवला तरुणाचा जीव

केरळमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बसच्या दरवाजाच्या बाजूला असलेल्या एका तरुणाचा तोल गेला. तरुण दरवाजाबाहेर पडणार तितक्यात प्रवाशांना तिकीट देण्यात गुंग असलेल्या कंडक्टरने अचानक तरुणाचा हात धरला आणि त्याला आतमध्ये खेचले. कंडक्टरने जर या तरुणाला वाचवले नसते तर तरुण नक्कीच दरवाजाबाहेर फेकला गेला असता. यात तरुणाला गंभीर दुखापतही झाली असती. परंतु कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचल्याने या कंडक्टरवर सोशल मीडियावर काwतुकाचा वर्षाव केला जात आहे.

अंतराळवीर विल्यम्स अँडर्स यांचा अपघाती मृत्यू

अमेरिकेतील अपोलो 8 मिशनचे अंतराळवीर विल्यम्स अँडर्स यांचा शुक्रवारी रात्री उशिरा विमान अपघातात मृत्यू झाला. बिल अँडर्स हे पहिल्यांदा मानवाला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाण्याच्या पहिल्या मोहिमेचे अंतराळवीर होते. शुक्रवारी बिल वॉशिंग्टनमध्ये एकटेच छोटे विमान उडवत होते. विमान सिएटलच्या उत्तरेला पाण्यात कोसळले. यानंतर शोध पथकाला विमानाच्या अपघातस्थळी अँडर यांचा मृतदेह सापडला. त्यांचा मुलगा ग्रेग याने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. अमेरिकेचे फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन विमान अपघाताची चौकशी करत आहे.

फतेह अली खान यांचे बदो बदीगाणे हटवले

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले चाहत फतेह अली खान यांचे ‘बदो बदी’ हे गाणे यूटय़ूबवरून हटवण्यात आले आहे. चाहत फतेह अली खान यांचे हे गाणे इन्स्टाग्राम रील्स, यूटय़ूब व्हिडीओज आणि शॉर्ट्सवर धुमाकूळ घालत होते. यूटय़ूबवर पोस्ट करण्यात आलेल्या या गाण्याच्या व्हिडीओला 25 मिलियनहून जास्त ह्यूज मिळाले होते. हे गाणे कॉपीराईट प्रकरणामुळे हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे गाणे 1973 मध्ये आलेला चित्रपट ‘बनारसी ठग’साठी नूर जहाँने गायले होते. दोन्ही गाण्याचे बोल सारखेच होते. यामुळे नूर जहाँच्या टीमने कॉपीराईटचा दावा केल्याने हे गाणे यूटय़ूबवरून हटवावे लागले.