सोना कितना सोना है… हिंदुस्थानने खरेदी केले 722 कोटी रुपयांचे सोने

हिंदुस्थानमधील महिला असो की पुरुष, सर्वांचीच सोन्याला पसंती आहे. महिलांना अंगावर सोने घालायला आवडते, तर पुरुषांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते. मे 2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने तब्बल 722 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले आहे. सोने खरेदी करण्यात हिंदुस्थान देश हा सर्वात मोठा तिसरा देश ठरला आहे. हिंदुस्थानपेक्षा स्वित्झर्लंडने सर्वाधिक सोने खरेदी करून नंबर वन क्रमांक पटकावला आहे, तर चीनने त्याखालोखाल सोने खरेदी करून दुसरा नंबर पटकावला आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये हिंदुस्थानने सोन्याचा साठा सुमारे 204 टनांनी वाढवला आहे. देशातील सोन्याचा साठा मार्च 2019 मध्ये 618.2 टन होता, जो 31 मार्च 2024 रोजी 33 टक्क्यांनी वाढून 822.1 टन झाला. मात्र या काळात सोन्याच्या किमती सुमारे 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे गेल्या महिन्यात जागतिक सोन्याच्या बाजारातील सरासरी दैनंदिन व्यवहार 18 लाख कोटी रुपये होता. हा एप्रिल 2024 पेक्षा 13 टक्के कमी आहे, परंतु 2023 मधील सरासरी 13.6 लाख कोटी रुपयांपेक्षा 32.51 टक्के अधिक आहे.

सोने खरेदीत टॉप 10 देश

देश मेमधील खरेदी

  • स्वित्झर्लंड 2,461 कोटी रुपये
  • चीन 2,109 कोटी रुपये
  • हिंदुस्थान 722 कोटी रुपये
  • जर्मनी 556 कोटी रुपये
  • दक्षिण आफ्रिका 459 कोटी रुपये
  • आयर्लंड 459 कोटी रुपये
  • जपान 376 कोटी रुपये
  • फ्रान्स 247 कोटी रुपये
  • तुर्की 107 कोटी रुपये